Lokmat International News Update | पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड, कुलभूषण जाधवां चे अपहरणच

2021-09-13 0

बलोच नेता मामा कदिर यांच्या म्‍हणण्या नुसार बलुचिस्‍थानमध्ये आयएसआयसाठी काम करणाऱ्या मुल्‍ला उमर बलुच याने चाबहारमधून जाधव यांचे अपहरण केले आहे. कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यासाठी कोट्यवधी रुयये मुल्‍ला उमरला दिला असल्याचा धक्‍कादायक खुलासाही या नेत्‍यांनी केला आहे.कदीर यांच्या मतानुसार कुलभूषण जाधव यांचे हात बांधण्यात आले होते, तर  डोळयावर पट्टी बांधण्यात आली होती.धक्‍का देऊन त्‍यांना वाहनात बसवण्यात आले व चाबहारमधून कुलभूषण जाधवांना इराण बलुचिस्‍थान मधील मशकीलमध्ये आणण्यात आले. येथून पुढे बलुचिस्‍थान ची राजधानी क्‍वेटाला आणण्यात आले. यानंतर इस्‍लामाबादमध्ये पोहचवण्यात आले.कदीर यांच्या या दाव्‍यामुळे पाकिस्‍तानचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आला आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires